l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जैन सोशल ग्रुप फलटणच्या सन २०२५- २०२७ कार्य कालासाठी शश्रीपाल जैन यांची नुकतीच अध्यक्षपदी तसेच सचिव पदी निना कोठारी,खजिनदार पदी राजेश शहा व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

तसेच जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरमच्या अध्यक्ष पदी मनिषा व्होरा,सचिव पदी वृषाली गांधी, खजिनदार पदी विनयश्री दोशी व कार्यकारणीची निवड करण्यात आली.

जैन सोशल ग्रुप अंतर्गत युवा फोरमच्या अध्यक्षपदी पुनीत दोशी, सचिव पदी सिद्धांत शहा, खजिनदार पदी मीहीर गांधी व कार्यकारणी ची निवड करण्यात आली.जैन सोशल ग्रुप अंतर्गत तिन्ही ग्रुपच्या नूतन कार्यकारणी निवडीबद्दल जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष बिरेनभई शहा, महाराष्ट्र रीजन अध्यक्ष दिलीपभई मेहता,सचिव सचिनभई शहा, उपाध्यक्ष सचिन दोशी, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशभई दोशी, जैन सोशल ग्रुपच्या माजी अध्यक्षां सविता दोशी,राजेंद्र कोठारी, डाॅ. सूर्यकांत दोशी,माजी सचिव प्रीतम शहा, संगीनी फोरम संस्थापक अध्यक्षां सौ.स्मिता शहा व सर्व पदाधिकारी संचालक व सदस्य यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.दि.२२ एप्रिल रोजी जैन सोशल ग्रुप परिवार नुतन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.
