कु. समृद्धी गणेश कांबळे या दिव्यांग विद्यार्थिनीचा संगिनी फोरम कडून सत्कार

फलटण :-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा परिषद ,सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय गोळेगाव, फलटण येथील दिव्यांग विद्यार्थिनी कु‌.समृद्धी गणेश कांबळे हिचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल संगिनी फोरम फलटण च्या वतीने अध्यक्षां सौ.अपर्णा श्रीपाल जैन यांच्या शुभहस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णांत तथा दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली ताई चोरमले, संगिनी फोरम माजी अध्यक्षां सौ.निना कोठारी, माजी सचिव सौ. पौर्णिमा शहा,संगिनी सदस्या सौ.जयश्री उपाध्ये, सौ.संध्या महाजन,सौ.सुरेखा उपाध्ये, विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे मॅडम, शिक्षिका सौ.हेमा गोडसे,सौ.विजया भोजने,कला शिक्षक उदय निकम उपस्थित होते.

error: Content is protected !!