फलटण प्रतिनिधी :- श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग व्यक्ती विकास केंद्र, भडकमकरनगर, फलटण याठिकाणी शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून करण्यात आले होते.यावेळी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ फलटण तालुक्यासह शहरातील मान्यवरांसह अनेक भाविकांनी घेतला.

महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऍड जिजामाला नाईक निंबाळकर, फलटणच्या उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, फलटण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष नितीनभैया भोसले, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी व भाविकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला.

महंमद गझनीने १०२६ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगावर यशस्वी आक्रमण केले होते. परंतु, मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे अंश स्थानिक पुजाऱ्यांनी सुरक्षित ठेवले होते. हे अंश शेकडो वर्षे गुप्त ठेवून त्यांच्या पूजेची परंपरा अखंड सुरू राहिली. १९२४ साली है अंश कांची शंकराचार्य यांना दाखवण्यात आले, त्यांनी हे अंश १०० वर्षे अधिक काळ सुरक्षित ठेवून, २०२४ मध्ये श्री श्री रविशंकर यांच्याकडे पुनःस्थापनेसाठी देण्याचा सल्ला दिला होता.

सोमनाथच्या मंदिरामध्ये १००० वर्षापूर्वी हवेत तरंगणारे ज्योतिर्लिंग होते, सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे शिवलिंग हा एक सामान्य दगड नसून याच्यामध्ये १४० गॉस मॅग्नेटिक फोर्स आहे. पृथ्वीवरील कोणत्याही दगडामध्ये एवढी चुंबकीय शक्ती नाही ही शक्ती शिवलिंगाच्या केंद्रामध्ये आहे पृथ्वीवरील कोणत्याही मॅग्नेटिक पदार्थ मध्ये एवढी शक्ती नाही. वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, है शिवलिंग पृथ्वीवरील पदार्थ नाही दुसऱ्या लोकातून किंवा ग्रहावरून पडलेला असावा वैज्ञानिकांनी त्याला अन आयडेंटिफाइड मटेरियल (unidentified material) असे म्हटले आहे हे शिवलिंग १००० वर्षानंतर जगासमोर येत असून हे शिवलिंग हा एक दगड नसून आपल्या आतील असणाऱ्या प्रकाश आणि चेतनेचे एक प्रतीक असल्याचे मानण्यात येत आहे.
यावर्षीच्या महाशिवरात्रीला बंगळुरू येथील आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक करून त्याचे भव्य दर्शन भारतभर सुरू केले आहे.फलटण येथे आयोजित दर्शन सोहळा कार्यक्रम पार पाडण्याकरिता आर्ट ऑफ लिविंग पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दादासाहेब कदम, प्रविराज नाळे, फलटण शाखेचे डॉ. माधव पोळ, डॉ. विक्रम निकम, डॉ. संध्या निकम, डॉ. निलिमा दाते, उत्तम चोरमले, सौ. सुनीता चोरमले, ज्ञानेश्वर घाडगे, किशोर खेडकर, सौ.सविता लावंड, सौ. अनुराधा गोडसे, सौ. जयश्री पाटील, दिपक कदम, अमोल येवले आदी सेवेकर्यांनी सहभाग घेतला होता.