फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) पदी श्रीमती. प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

फलटण :- महसूल व वन विभाग यांनी १० मार्च २०२५ रोजी फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) म्हणून श्रीमती. प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती बाबत आदेश जारी केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदली नंतर पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहत होते आता सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उपविभागीय अधिकारी पदी कार्यरत असलेल्या श्रीमती. प्रियंका आंबेकर यांची फलटण उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महसूल व वन विभाग यांनी १० मार्च २०२५ रोजी याबाबत आदेश जारी केला असून लवकरच त्या फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

error: Content is protected !!