फलटण:- पाडेगाव तालुका खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमाअंतर्गत साठवणूक धान्य किडी संबंधित मार्गदर्शन केले. व त्यावर कशे नियत्रंण करता येईल याचे पण मार्गदर्शन कृषीदुतानी केले.

यासाठी प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा घालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित व प्रा. सौ. माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत,इंगोले धनंजय ,काटकर सौरभ,केसकर राहुल, रनवरे शिवतेज,कांबळे रोहन, धुमाळ श्रीजीत ,गोडसे आदित्य ,यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.
