फलटण:- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी तडकाफडकी बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची बदली झाल्याचे अधिकृत आदेश काढण्यात आले असून या बदलीमुळे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास सोडतील यात तीळ मात्र शंका नाही.
फलटण शहरात गेल्या दोन वर्षापासून कायदा व सुव्यवस्था वेशीला टांगली होती अनेक अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाल्याचे दिसत होते सदर अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला जनता कंटाळली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज अनेक वृत्तपत्र माध्यमांनी फलटण शहरांमध्ये डी.जे प्रकरण व चक्री व्यवसायाला शहर पोलीस व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह हे जबाबदार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पोलीस स्तरावरून सदरची तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.
आता हजर होणारे नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना शहरातील मटका-जुगार, चक्री याचबरोबर अवैध धंदे, वाहतूक कोंडी, घरफोडी,चोरी व लुटमार यामध्ये झालेली वाढ, मुलीच्या छेडछाडी,वाहन चोरी,फसवणूक व ईतर गुन्ह्यात झालेली वाढ थांबण्याचे आव्हान आहे.आता बदलीने हजर होणारे नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या कामगिरीवर फलटण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

