मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा बहुमान

फलटण -शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चषक देऊन बहुमान मिळाला.रा.शाहू महाविद्यालय,कोल्हापूर सन 2024-25 येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरणस्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय,फलटणची जलतरण कन्या कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठ सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा चषक देऊन बहुमान मिळाला तसेच वैयक्तिक महिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा सुद्धा चषक देऊन बहुमान मिळाला.

तिने50m.ButterFly,50m.,100m.,200m.BackStroke,50m.,100m.,200m.,400m.,800m,FreeStyle,200m.I.M.क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक संपादन केला.तसेच मुधोजी महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!