महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाचा दहावी निकाल १०० टक्के

फलटण प्रतिनिधी – महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राखली आहे.

विशेष म्हणजे ज्यांना ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम हा नॉर्मल मुलांचा आहे मात्र परीक्षेची वेळ इतर मुलांपेक्षा अर्धा तास वाढवून दिली जाते. अशा परिस्थितीतही ऐकता व बोलता येत नसताना देखील नॉर्मल मुलांचा अभ्यास घेऊन ही मुले इयत्ता दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली असल्यामुळे त्यांना शिकविणाऱ्या शिक्षक वर्गाचे या ठिकाणी विशेष कौतुक होत आहे.

खरंतर महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाला इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण द्यावयास शासनाची मान्यता आहे. अशा परिस्थितीत ७ वी पास झाल्यानंतर ही मुले पुढे उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हती व त्यामुळे त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत नव्हत्या या सर्व गोष्टींचा विचार करून महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले व संस्थेच्या सचिव सौ.वैशाली चोरमले यांनी दहावीच्या शिक्षणाची विना मोबदला ज्यादाचे शिक्षक नेमून मूकबधिर मुलांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे यांनी दिली आहे.

संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, उपशिक्षिका सौ. हेमा गोडसे, सौ. विजया मठपती, उदय निकम शिक्षकेतर कर्मचारी चेतन खरात, नितेश शिंदे व मनीषा चोरमले यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!