शेअर मार्केटच्या आमिषाने दुकान व्यवसायिकास ४८ लाखांचा गंडा

फलटण:- साखरवाडी ता फलटण येथील एका किराणा दुकान व्यवसायिकास शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगून ४८ लाख १२ हजार ३५३ रुपयांची फसवणुक करण्यात आली या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,साखरवाडी ता फलटण येथील
अभिजित अजित शहा (वय ४५ वर्षे) या किराणा दुकान व्यावसायिक यांना दिनांक ६/९/२०२४ ते दिनांक १८/११/२०२४ रोजी साखरवाडी येथे घरी असताना व्हाट्सअॅप वर मोबाईल नंबर वरून आरोही शर्मा या व्यक्तीचा कॉल आला त्यांनी मी शेअर मार्केट अँडव्हायजर आहे असे सांगितले. तुम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगितले असता. त्यानंतर
अभिजित अजित शहा यांना व्हाट्सअँप लिंक पाठवून कॉल करून एका प्लटफॉर्म वर शेअर मार्केट मध्ये जास्त परतावा मिळेल याचे अमिश दाखवून तसेच परतावा ची रक्कम प्राप्त करण्या करिता डिपोजिट रक्कम व्ही.आय.पी मेंबर फी, टॅक्स, व इतर खोटी प्रलोभणे देवून ४८ लाख १२ हजार ३५३ रुपयांची वेगवेगळ्या १४ अकाउंट नंबर ट्रान्फर करायला लावून त्यातील कसलाही परतावा न करता एकून ४८ लाख १२ हजार ३५३ रुपयांची फसवणूक केली म्हणून आरोही शर्मा या व्यक्तीच्या विरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.

error: Content is protected !!