फलटण – कॅप्टन भोसले हेल्थ क्लब फलटणच्या वतीने सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेस फलटणकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या स्पर्धेत कराडच्या रामा मैनाक नी फलटण श्री २०२५ चा बहुमान पटकावला.

कॅप्टन भोसले हेल्थ क्लब,फलटण व सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत ५० ते ५५ किलो गटांमध्ये प्रथम क्रमांक सुरज नेवसे द्वितीय क्रमांक आकाश देसाई तृतीय क्रमांक प्रथमेश भिसे यांनी पटकाविला.
५५ ते ६० किलो वजन गटात प्रथम क्रमांक ओम शिदे द्वितीय क्रमांक राकेश साळुंखे तृतीय क्रमांक उदय शिंदे यांनी पटकाविला. ६० ते ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक रामा मैनाक द्वितीय क्रमांक आकाश झाडे तृतीय क्रमांक ऋषिकेश गरड यांनी पटकाविला ६५ ते ७० या किलो वजन गटात प्रथम क्रमांक विजय यादव द्वितीय क्रमांक अनिल जाधव तृतीय क्रमांक अनिकेत दाते यांनी पटकाविला.

७० ते ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक रोहित गजरे द्वितीय क्रमांक स्वप्नील जाधव तृतीय क्रमांक संजय मोरे यांनी पटकाविला. तर खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक अजिंक्य महामुनी द्वितीय क्रमांक अभिजित पाडळे तृतीय क्रमांक सलमान शेख यांनी पटकाविला. या स्पर्धेमध्ये बेस्ट पोजर चा बहूमान ओम शिंदे चा यांनी पटकावला तर फलटण श्री २०२५ चा बहुमान रामा मैनाक कराड यांनी पटकावलाया स्पर्धेमध्ये पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, चंदू पवार, अजित सांडगे, अमोल ननावरे, सुमित क्षीरसागर, उमेश मोहटकर यांनी काम पाहिले.स्पर्धेतील उपस्थिताचे स्वागत व प्रास्ताविक महाराजा मल्टीस्टेटची व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले. सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी आभार मानले.
स्पर्धेप्रसंगी सद्गुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम फणसे,सद्गुरु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अजय माळवे,सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे, संत कृपा उद्योग समूहाचे विलास नलवडे, संदीप चोरमले, अमोल सस्ते, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.