वाखरी येथे तालुकास्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आ. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण – प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आयोजित ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव फलटण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे वाखरी येये आ. सचिन पाटील यांचे हस्ते उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आ . सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील ग्रामीण क्रीडापटूंच्या प्रतिभेला वाव व विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी फलटण तालुक्यात आधुनिक सुविधांनी युक्त भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मनोदय व्यक्त केला .स्थानिक कुस्तीपटूंना स्वयंप्रेरणेने विनामोबदला प्रशिक्षण देऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचविण्याचे काम कष्टाने व जिद्दीने करणाऱ्या जय हनुमान तालीम क्रीडा संकुल वाखरी यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले व त्याना त्यांच्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले.शैक्षणिक गुणवत्तेबरोबर शारीरिक विकासाचे महत्त्व पाटील यांनी अधोरेखित केले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी वाखरी येथील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2024 ने सन्मानित आंतरराष्ट्रीय हॉकीपटू कु अक्षदा ढेकळे आणि यावर्षी शालेय कुस्तीमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या अमृता ढेकळे वैष्णवी ढेकळे स्नेहा ढेकळे राधिका जाधव सानिया जाधव या खेळाडूंचाही आमदार सचिन पाटील यांनी सत्कार केला.

दिवसभर सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निष्पक्षपातीपणे पार पडल्या .या स्पर्धेत विविध वजन गटात पुढील स्पर्धकांनी विजेते पदे पटकावली- आराध्या शिंदे, ज्ञानदा शेंडगे,आराध्या तांबे, प्रगती सूळ ,साई ढेकळे (वाखरी ), कृष्णा लोखंडे,ओम लोखंडे (पीर साहेब नगर ढवळ),आदिश्री तांबे (वडले), प्रतिभा लोंढे, अमर पवार (बागेवाडी),निर्भय ढेकळे (वाठार नि ),वरद भोसले, रुद्र गायकवाड (ढवळ), मयूर धायगुडे, अभिषेक ठोंबरे, सोहम सावंत(मुळीकवाडी) हे विद्यार्थी जिल्हास्तरावर आपापल्या वजन गटात फलटण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेच्या आयोजनात वाखरी येथील जय हनुमान क्रीडा संकुल व वाखरी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.स्पर्धेचे अधिकृत पंच म्हणून हिंदुराव लोखंडे, अजय कदम, रमेश थोरात, सुनील लोखंडे यांनी काम पाहिले .याप्रसंगी महाराष्ट्र केसरी श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै बापूराव लोखंडे ,संदिप चोरमले,सरपंच सौ शुभांगीताई शिंदे, शुभम नलवडे, तुकाराम शिंदे,सुलभा मोहिते, दादा ढेकळे, संतोष ढेकळे, संदिप ढेकळे, पै यशवंत तांबे ,पै संदीप शेंडगे,पै स्वप्नील ढेकळे ,पै प्रमोद शिंदे ,पै राहुल सरक,पै विक्रम कोकरे ,पै निलेश लोखंडे, पै जयदीप गायकवाड, केंद्र प्रमुख सोमनाथ लोखंडे ,संजय बोबडे, हिम्मत जगताप, संजय धुमाळ, बबन निकाळजे ,दादासो रणवरे, राजश्री कुंभार , लता दीक्षित, संगीता मगर, क्रीडा समन्वयक विकास भुजबळ व पांडुरंग निकाळजे, भोलचंद बरकडे, राजेंद्र सरक, रणजीत निंबाळकर, गणेश पोमणे,विशाल खताळ, संजय लोखंडे उपस्थित होते.

गटविकास अधिकारी सतिश कुंभार व गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ व विस्तार अधिकारी अलका जाधव, दारासिंग निकाळजे, चन्नया मठपती ,पारसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हा स्तर सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!