फलटण न्यायालयास एका छताखाली नव्याने इमारतीचा ठराव पारित केल्याचा आनंद – पी. व्ही.चतुर

फलटण प्रतिनिधी – अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटणचा प्रथमच वर्धापन दिन साजरा करताना आनंद होत असून फलटण न्यायालयास एका छताखाली नव्याने इमारतीची आवश्यकता असून त्यामध्ये सर्व वकील बांधवांसाठी सर्व सुख सुविधा नियुक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम होण्यासाठी ठराव पारित करून दिलेला आहे याचा आनंद होत असल्याचे पी. व्ही.चतुर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणाले, ते फलटण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय फलटणचा प्रथमच वर्धापन दिन आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी श्रीमती जे. एस.खेडकर – गोयल, मुख्य न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश फलटण, मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,कृष्णा खोरे विकास महामंडळ चे संचालक माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब नलावडे ॲड. बापूसाहेब सरक अध्यक्ष फलटण बार असोसिएशन यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पी. व्ही.चतुर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व ॲड. बापूसाहेब सरक अध्यक्ष फलटण बार असोसिएशन यांच्या हस्ते प्रथम वर्धापन दिन केक कापण्यात आला. यावेळी सीनियर व ज्युनिअर वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!