महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण :- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी उचलबांगडी करत तडकाफडकी बदली करत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती केली असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यापुढे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आव्हान असून शहरातील बोकाळलेली चक्रीची चक्री नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे रोखण्यात यशस्वी ठरणार का ?
मागील दोन वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहणारे हेमंतकुमार शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात मटका-जुगार, चक्री याचबरोबर अवैध धंदे, वाहतूक कोंडी, घरफोडी,चोरी व लुटमार, मुलीच्या छेडछाडी,वाहन चोरी,फसवणूक व वेश्या व्यवसाय ईतर गुन्ह्यात झालेली वाढ रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांच्यावर अनेक वेळा झाला होता. दोन वर्षांमध्ये गुन्ह्याची आकडेवारी कमी दाखवण्यासाठी अनेक गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्यात येत नव्हते शहरात गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली होती.
एकंदरीत पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची कारकीर्दही आज अखेर शहर पोलीस ठाण्यात काम केलेल्या पोलीस निरीक्षकाना साजेशी नव्हती. डीजे डान्स असो किंवा चक्रीची चक्री असो दोन्ही मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मूकसंमती होती.फलटण शहरातील अनेक परिसरात मटक्याबरोबर चक्रीचा अवैध व्यवसायात चांगलीच वाढ झाली आहे. आज रोजी फलटण शहर परिसर अवैध व्यवसायांचे माहेर घर बनले असून शहरातील विविध भागात अनेक चक्री जुगार चे अड्डे सुरू असून चक्री अड्यावर पोलिस कारवाई झाली नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
एखाद्या चक्रीच्या अड्ड्यावर तक्रार झाली तर कागदोपत्री एखादी कारवाई होत असून इतर चक्री अड्ड्यांना संरक्षण मिळत आहे.ज्या चक्रीमुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली तो चक्री जुगार व्यवसाय फलटण शहरात खुलेआम सुरू आहे त्याचा उलघडा होण्याची गरज आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणारा हा चक्री दिवसभर सुरू असून या चक्रीची व्यवसायात लाखोंची उलाढाल होत आहे.
खुलेआम सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर शहर पोलीस प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने फलटणकामध्ये आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे चक्रीची चक्री कायमची थांबवून फलटणकरांना दिलासा देणार का ? असा संवाद सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. येणाऱ्या काळात चक्रीचा व्यवसाय असाच सुरू राहिल्यास फलटण शहरास चक्रीचे शहर संबोधण्यात येऊ शकते.
पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यापुढे फलटण शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी यांच्यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान असून जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती फलटण शहरातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी केली असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या विश्वासात किती खरे ठरतील हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

