ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- फुटलेला पत्रा …सडलेल्या खिडक्या… कुजलेली लाकडी … उंदीर घुषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ….अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत कोणीच पोलीस कर्मचाऱी राहत नसून पोलीसांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे.
पाटण तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे म्हणून ढेबेवाडीची ओळख आहे शिवाय या पोलीस ठाण्यांतर्गत तळमावले येथे आऊट पोस्ट आहे ढेबेवाडी व कुंभारगाव या दोन विभागांचा या पोलीस ठाण्याची संबंध येतो मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर जादा ताण पडत आहे.
वसदरक्षणालय खलनिग्रहणाय’हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या पोलीस दलामुळे आज प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे मात्र याच पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे ढेबेवाडीतील पोलीस वसाहतीकडे पाहिल्यावर लक्षात येईल राजकीय दृष्ट्या संवेदनशील विभाग म्हणून ढेबेवाडी आणि कुंभारगाव विभागाकडे पाहिले जाते त्यामुळे पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते एकीकडे पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांवर जादा कामाचा ताण पडत आहे त्यांना ऑन ड्युटी 24 तास काम करावे लागत आहे.
दोन विभागांवर ५९ गावांचा भार असून ढेबेवाडी आणि कुंभारगाव या दोन्ही विभागातील गावे आणि वाड्यावस्त्यांचा या पोलीस ठाण्याचा समावेश आहे या विभागातील अनेक गावे डोंगर कपारी असल्याने त्या ठिकाणाची माहिती पोलिसांना लवकर मिळत नाही कारण पोलीसांची अपुरी संख्या याला कारणीभूत आहे.
ढेबेवाडी पोलीस वसाहतीत अठरा खोल्यांचा समावेश असून,वसाहतीची झालेली दैनिय अवस्थेमुळे आता कोणीच राहत नाही यापूर्वी येथील खोल्यांमध्ये पोलीस कर्मचारी राहत होते मात्र अलीकडच्या काळात वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने येथे कोणीही पोलीस कर्मचारी राहत नाही.