फलटण मध्ये पितृपक्षानंतर मोठा राजकीय निर्णय होण्याची दाट शक्यता, अनेकांच्या पोटात गोळा

विक्रम चोरमले

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण :-  फलटण तालुक्यातील राजकीय पलटावर पितृपक्षानंतर म्हणजेच सोमवारी उशिरा पर्यंत राजकीय निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वर्ष राजकीय दृष्टीने जपलेल्या पण ऐन वेळी स्वतंत्र झालेल्या तसेच ईतर पक्षात उडी मारलेल्या नेत्यांच्या व कार्यकर्त्याच्या पोटात यामुळे गोळा येण्यास सुरवात झाली आहे.        

 राजकारणात कोण कोणाच कायमचे शत्रू नसतं , जस सोयीचे राजकारण होईल अशा तडजोडी होताना फलटण तालुक्याने पाहिल्या आहेत. अनेक वर्ष ज्यांच्यावर आग पाखड केली जाते त्यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिकाही राजकारणात घेतली जात आहे. आज अखेर राजकीय निर्णय घेण्यात उशीर झाल्याचा तसेच धरसोडीचा फटका बसल्याचे अनेक उदाहरणे सांगता येतील.

पण यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका पाहता निर्णय घेण्यात उशीर न करता तसेच कोणतेही धरसोड न करता मोठा येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून फलटण तालुक्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप काही काळ का होईना थांबले असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात दोन राजकीय कट्टर वैरी एकत्र दिसले यावेळी त्यांच्या भाषणात त्यांनी सूचक वक्तव्य करून एक सूचक इशाराही दिला होता.          

 पितृपक्षांमुळे अडलेली बोलणी पुन्हा सुरू होऊन तालुक्यासह जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही कौटुंबिक कारणामुळे थांबलेला निर्णय उद्याच्याला होण्याची दाट शक्यता असून सोमवारी फलटणच्या राजकारणात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. नेते मंडळी याबाबत सविस्तर बोलणे टाळत असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने एका गटाचा मोठा राजकीय तोटा झाल्याने तालुक्यात राजकीय तोटा झाल्याने यावेळी निर्णय अटळ असल्याचे बोलले जात आहे.फलटण तालुक्यातील राजकीय निर्णयानंतर तिसरी आघाडी म्हणून अनेक वर्षापासून नुसतीच चूल मांडून बसलेल्या काही नेत्यांना व माजी नगरसेवकांना तसेच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

तालुक्यात राजकीय नेतृत्वानी वैर संपवून राजकारणात मोठ्या तडजोडी केल्याचे चित्र नवीन नाही यापूर्वी फलटण तालुक्याच्या इतिहासात अनेक नेतृत्वानी राजकीय तडजोडी केल्याचे पाहण्यात आहे. पण यावेळी जर राजकीय तडजोड झाली तर याचा फटका काही नेतेमंडळी व बेडूक उड्या मारलेल्या कार्यकर्त्यांना कायमच्या मारक ठरणार आहेत.

सध्याच्या पक्षात राजकीय ताकद मिळत नसल्याने तसेच विविध मागण्या पूर्ण होत असल्याने राजकीय भविष्याची चिंता लागून राहिलेल्या नेतृत्वांनी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत असल्याने येणाऱ्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत समजोत्याचे जागा वाटप होऊन राजकीय अस्थिरता थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे. पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच सोमवारनंतर होणाऱ्या राजकीय घडामोडी या फलटण तालुक्याच्या राजकीय इतिहासात अनेकांच्या बत्ती गुल झाल्याची नोंद अधोरेखित करणार आहेत.

येणाऱ्या काळात जर राजकीय निर्णय झाला तर अत्यंत जवळचे पण सत्ता नसल्याने सोडून गेलेली नेतेमंडळी व काही कार्यकर्ते यांचे पुढील राजकीय अस्तित्व धोक्यात येणार असून सर्वाधिक फटका पक्ष प्रवेश केलेल्या नेतेमंडळी व काही कार्यकर्ते यांना निश्चितच बसण्याची शक्यता आहे.
यापूर्वी दोन्ही नेतेमंडळींची राजकीय संघर्षाचा फायदा घेऊन स्वतःची पोळी भाजणाऱ्या नेतेमंडळी व काही कार्यकर्ते यांचे पितळ उघडे पडणार आहे. येणाऱ्या काळात यामुळे तिसरी आघाडी तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पण ही तिसरी आघाडी दोन प्रबळ नेते मंडळीच्या पुढे टिकण्याची शक्यता धूसर आहे. 
error: Content is protected !!