राजेंद्र गोफणे यांची बॅडमिंटन खेळ प्रकारामध्ये राज्य पातळीवर निवड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित शिक्षक कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आयोजलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये फलटण तालुक्यातील धनगरवाडी (हिंगणगाव) या शाळेतील कार्यरत शिक्षक राजेंद्र गोफणे यांची बॅडमिंटन खेळ प्रकारामध्ये राज्य पातळीवर निवड झालेली आहे.

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्पर्धेतून ही निवड झालेली आहे. राजेंद्र गोफणेहे उत्तम बॅडमिंटनपटू असून सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षक कर्मचारी व अधिकारी स्पर्धेमध्येही बॅडमिंटन डबल्स खेळ प्रकारात तीन वर्ष ते विजेतेपदाचे मानकरी राहिलेले आहेत. राजेंद्र गोफणे हे जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच म्हणून परीक्षा उत्तीर्ण असून सध्या ते बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन या संस्थेवर सल्लागार म्हणूनही काम करतात. पुणे अकलूज बारामती माळीनगर येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्येही यश मिळवलेले आहे.

राजेंद्र गोफणे यांची बदली नुकतीच महाबळेश्वर येथून फलटणला झालेली असून महाबळेश्वर येथील त्यांच्या दरे शाळेतील काठीवरील कसरत या विद्यार्थ्यांच्या साहसी उपक्रमामुळे ते सर्वांना परिचित आहेत. या उपक्रमासाठी सातारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी राजेंद्र गोफणे यांचे वेळोवेळी कौतुकही केले आहे.

महाबळेश्वर येथे ज्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस राजेंद्र गोफणे यांनी विविध संस्था व मित्र परिवाराच्या सहकार्यातून पाच गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदतही केली होती. राजेंद्र गोफणे यांचे वय 51 वर्ष असून त्यांनी खेळाची आवड जोपासत हे नेत्रदीपक यश मिळविले बद्दल विविध स्तरातून सरांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!