पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फलटण येथे झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा

फलटण प्रतिनिधी:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फलटण येथील रामकुंड टॉवर परिसरात झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी झाडाची साफसफाई, झाडाना आळी, परिसर स्वच्छ करून झाडाना सेंद्रिय खत व पाणी घालून झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा झाला.

यावेळी फलटण तहसीलदार मा. डॉ.अभिजीत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फलटण तहसीलदार मा. डॉ.अभिजीत जाधव म्हणाले की, झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना फारच सुंदर असून असे वाढदिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरे होण्याची गरज आहे या निमित्ताने विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून पर्यावरणाची होणारी हानी रोखता येणार आहे. येणाऱ्या काळात वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल या संकटांना सामोरे जाण्यासाठी एक व्यक्तीने झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं हेच आपलं कर्तव्य आहे.

अधिवक्ता परिषद फलटणचे अध्यक्ष ॲड.बापूसाहेब बाबासो सरक म्हणाले की, आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून देखील प्रत्येक वर्षी तापमानात होणारी वाढ आणि त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून संकल्प करायला हवा आजपासून आपण किमान प्रत्येकाने एक झाड लावू आणि त्याची काळजी घेऊ. प्रत्येकाने मोकळ्या जागेवर वृक्षारोपण केल्यास येत्या काळात आपणास हवामानात होणारे बदल आणि तापमान वाढ या संकटाना सामोरे जाण्यास मदत होईल व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवता येईल.

रामकुंड टॉवर परिसरात तीन वर्षापूर्वी झाडांची लागवड करण्यात आली होती त्या झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी झाडाची साफसफाई केली तसेच झाडाना आळी करत परिसर स्वच्छ करून झाडाना सेंद्रिय खत व पाणी घालून झाडांचा अनोखा तिसरा वाढदिवस साजरा केला.

यावेळी तहसीलदार मा. डॉ.अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, अधिवक्ता परिषद फलटण चे अध्यक्ष ॲड.बापूसाहेब बाबासो सरक,उपाध्यक्ष ॲड.भानुदास शिर्के, ॲड.मेघा अहिवळे ॲड.गणेश तावरे, ॲड.राहुल बोराटे,ॲड.विजय भोसले, ॲड . रवी अहिवळे, ॲड.एल.एच.शेंडगे, ॲड.प्रशांत निंबाळकर , ॲड.शरद जगदाळे, ॲड.रुपाली शिंदे, ॲड.रुपाली चांगन, ॲड.वंदना सूळ, ॲड. मयूर शेरखाने, ॲड.प्रशांत भोसले,पत्रकार विक्रम चोरमले,पत्रकार अनिल पिसाळ,यशवंत जाधव, राजेंद्र यादव हे उपस्थित होते.

error: Content is protected !!