चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मकर संक्रांत साजरी करणार नाहीत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे तिळगुळ व सण समारंभाचे आयोजन केले जाते. मात्र, देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या सन्मानार्थ यंदाचा तिळगुळाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

अवघ्या तीन दिवसांत चार जवानांचे बलिदान

संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या चार दुर्दैवी घटनांमध्ये पुढील जवानांना वीरगती प्राप्त झाली

जवान वैभव श्रीकृष्ण लहाने, १२ मराठा इन्फंट्री, काश्मीर येथे कर्तव्य बजावत असतानामु. कपिलेश्वर, जि. अकोला

नायक विलास विठ्ठल गावडे,दक्षिण आफ्रिका येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यानमु. बरड, ता. फलटण, जि. सातारा

जवान अभिजीत माने,मु. भोसे, ता. कोरेगाव, जि. सातारा

जवान प्रमोद परशुराम जाधव,मु. दरे, जि. सातारा— अवघ्या आठ तासांच्या चिमुकल्या बाळाला न पाहताच त्यांनी देशासाठी प्राणार्पण केले.

श्रीमंत रामराजे यांची भावनिक प्रतिक्रिया“देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतीसमोर कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नाही. हा काळ शोक व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याचा आहे,” असे सांगत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

चार जवानांच्या हौतात्म्याने सातारा, अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून, देशभरातून वीर जवानांना आदरांजली वाहिली जात आहे.

error: Content is protected !!