फलटणच्या विकासासाठी रणजितसिंह यांनी सातत्याने संघर्ष केला :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण : फलटणच्या विकासासाठी ज्यांनी सातत्याने संघर्ष केला त्या रणजितसिंह ना निंबाळकर यांच्या साठी व फलटण, माण ,खटाव मधील नागरिकांसाठी मला आनंद होतोय फलटण सारख्या ऐतिहासिक भूमीत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांच्याकडून मोठया प्रमाणात विकास होतोय याचाही आनंद आहे नीरा देवधरचा पहिला टप्पा पूर्ण होत असतानाच आज दुसऱ्या टप्प्याचे भूमीपूजन होत आहे पूर्वी या भागाचे नेतृत्व करणारे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला पाणी देऊ शकले असते पण पाण्याचं स्वप्न त्यांना केवळ कागदावरच दाखवायचं होत व त्यातून स्वतःच राजकारण करायचं होतं असे स्पष्ट मत फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुल मैदानावर पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.               

यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ,बांधकाम मंत्री छ शिवेंद्रराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार शिंदे आमदार सचिन पाटील, आमदार महेश शिंदे ,आमदारराहुल कुल, आमदार मनोजदादा घोरपडे ,राम सातपुते राजन परिचारक, समशेरसिंह ना निंबाळकर,ऍड जिजामाला ना निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले रणजितदादा आणि जयकुमार गोरे यांनी फलटण माण खटावच्या दुष्काळी भागात पाणी आणले त्यांनी यासाठी खूप संघर्ष केला आहे माझा जन्मही दुष्काळी भागात झाला त्यामुळे तो संघर्ष मला माहित आहे.            

नीरा देवधरच पाणी येणं शक्य नाही म्हणून त्यांची थट्टा ही केली जायची तसेच माणदेश मध्ये आज वर जे साहित्य लिहले गेले त्या प्रत्येक साहित्याचा विषय दुष्काळ होता आज माण खटाव फलटण मध्ये दुष्काळ शोधावा लागणार आहे नीरा देवधर जिहे कटापूर टेम्भू या कामांमुळे चाळीस वर्षेंच्या संघर्षातून हा दिवस उभा राहिला प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सर्व स्वतःकडे ठेवणार्या नाही सांगतो रणजितसिंह यांचा संघर्ष पूर्णत्वाकडे जातोय.या कार्यक्रमात नीरा देवधर टप्पा दोन तसेच फलटण शहर , फलटण ग्रामिण व वाठार स्टेशन पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे, पालखी महामार्ग रस्ता उदघाटन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

“वो एक समंदर खंगालने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं… जिनकी अपनी लँगोटियाँ तक फटी हुई हैं, हमारी उपर किचड उछालने में लगे हुए हैं”।।रणजितसिंह यांनी आपल्या भाषणात हा शेर ऐकवला तसा गर्दीने एकच जल्लोष केला या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दाद दिली.

error: Content is protected !!