फलटण प्रतिनिधी:- ठाकुरकी ता फलटण येथे संदीप मनोहर रिटे या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आलेला होता त्याच्या डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता सदर प्रकरणी मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने (वय २१ वर्षे, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) व सोमनाथ माणीक मदने (वय ३२ वर्षे रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) या दोघांना अटक करून गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा येथे अज्ञात व्यक्तीने संदीप मनोहर रिटे (रा. ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा) याला गंभीर मारहाण करुन त्याचे गुप्तभाग कापून त्याचा खून केल्याची घटना घडली होती फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाने फलटण येथे गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून तेथील परिस्थितीची माहिती घेवून तपास केला असता फलटण शहरामधील मच्छी मार्केट येथे दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी मयत संदीप रिटे व अज्ञात व्यक्तीचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता.
त्या अज्ञात व्यक्तीने मयत संदीप याचा मोबाईल काढून घेवून तो तेथून निघुन गेला होता. त्याच्या पाठोपाठ मयत संदीप रिटे हा देखील गेला असल्याची खात्रीशीर बातमी पथकास मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.संशयित आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या चुलतभावाच्या सांगण्यावरून, साडेपाच लाख रूपयांची सुपारी ठरवून संदीप रिटे याला जीवे मारल्यावर पैसे देण्याच्या अटीवर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
याप्रकरणी मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने (वय २१ वर्षे, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) व सोमनाथ माणीक मदने (वय ३२ वर्षे रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.