ढेबेवाडी येथील चर्मकार वस्ती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत अण्णा कारंडे यांचे निवेदन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी येथील डॉ विठ्ठल कारंडे ते ढेबाआळी येथून आलेला पानंद रस्ता या दोन्ही रस्त्याला जोडणारा हा चर्मकार वस्तीतील अंतर्गत रस्ता असल्याने त्या रस्त्यावरती नागरिकांची ये-जा असते मात्र येथील काही रहिवाशांनी या रस्त्यावरती अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना ये -जा करताना नाहक त्रास होत आहे. याबाबत पाटणचे नायब तहसीलदार यांना अण्णा कारंडे यांनी निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे.

पाटणचे नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,ग्रामपंचायत ढेबेवाडी यांनी आम्हास राहत्या ठिकाणी असलेली मोजणी करून घ्यावी असे नोटीस दिले होते तरी त्या नोटीसप्रमाणे आम्ही मोजणी करून घेतली आहे. गोरखनाथ बाळू कारंडे व शांताबाई गोविंद कारंडे, प्लॉट नं. 80/74 या दोन्ही प्लॉटची ग्रामपंचायत आदेशानुसार मोजणी केली आहे.

त्याअंतर्गत हद्दी फिक्स केल्या आहेत. या व्यतिरिक्त सर्कल अधिकारी यांनी दि. 19/07/2024 रोजी पाहणी करून आमचा जबाब सुद्धा घेतला आहे. आमची सर्व पाहणी ग्रामपंचायत व सर्कल अधिकारी यांसकडून झाली आहे. तरी रस्त्यावरील झालेले ग्रामपंचायत व व्यक्तीगत अतिक्रमण काढण्यात यावे.

ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार आम्ही 72 ते 80 अशा 8 प्लॉटची मोजणी करून हद्द फिक्स केली आहे. वरील प्लॉट 30 बाय 50 चे असून रस्त्यावरती झालेल्या अतिक्रमण काढण्यात यावे.

अण्णा कारंडे – अध्यक्ष अ.जा.ज. मोर्चा. भाजप पाटण.

error: Content is protected !!