फलटण एस-टी डेपोला नवीन गाड्यांचा मुहूर्त सापडेना, चालक – वाहक रिकाम्या हातानेच परतले

फलटण प्रतिनिधी – फलटण एसटी डेपोला नवीन गाड्या येणार? हे अनेक दिवसांपासूनचे तुणतुणं कालपर्यंत वाजत होतं. फलटण आगारांमध्ये नव्याने दहा एसटी गाड्या दाखल झाल्याचा मोठा गवगवा सुद्धा झाला. मात्र येरे माझ्या मागल्यासारखेच. फलटण डेपो मध्ये एकही नवीन बस दाखल झाली नाही.

मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी फलटण येथून 10 चालक व दहा वाहक पुणे – दापोडी येथे नव्या बस आणण्यासाठी गेले होते, मात्र रिकाम्या हाताने परत आल्याने तालुक्यात पुन्हा एकदा निराशाचे वातावरण झाले आहे. दापोडी – पुणे येथील परिवहन महामंडळाच्या कार्यालयामध्ये फलटणचे 10 चालक व वाहक फलटण डेपो करिता नव्या कोऱ्या 10 बस आणण्यासाठी गेले असताना त्यांना रिकाम्या हातानेच परत यावे लागले असल्याने फलटण आगाराला नव्या बस मिळणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा भेडसावू लागला आहे. वास्तविक पाहता, फलटण डेपोकडे असणाऱ्या बसेस या अत्यंत अल्प आहेत, त्यातही अनेक बस कालबाह्य झाल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. फलटण डेपोला नव्या बस मिळाव्या याची मागणी खूप जुनीच आहे. त्यामुळे नव्या बस कधी मिळणार? हा प्रश्न कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा? यासारखाच कठीण होऊन बसला आहे.

error: Content is protected !!