फलटण:- फलटण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक 13 साठी अर्ज सादर केला.
अर्ज दाखल करताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या महत्त्वाच्या क्षणी फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व शहराध्यक्ष पंकज पवार व पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर भक्कम भूमिका मांडण्याचा संकल्प केला असून सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी ही त्या दिशेने महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
सचिन सूर्यवंशी यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळे प्रभागात चांगली पकड निर्माण केली आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांबाबत त्यांनी प्रयत्न केले आहेत.

