फलटण प्रतिनिधी: श्री सद्गुरु पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना 11 टक्के लाभांश देत आहे ही खरोखरच कौतुकाची बाब ठरेल असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण या संस्थेच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी चेअरमन तेजसिंह भोसले, व्हा. चेअरमन राजाराम फणसे, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले सद्गुरु पतसंस्थेचे संचालक तुषार गांधी, अॅड. मधुबाला भोसले, चंद्रकांत बर्गे, प्रभाकर भोसले, स्वाती फुले व इतर संचालक उपस्थित होते.
दिलीपसिंह भोसले म्हणाले, काटकसर प्रामाणिकपणा जपत संस्थेच्या वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहोत.प्रास्ताविक व स्वागतामध्ये चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेने आपला नावलौकीक कायम ठेवला आहे. संस्थेकडे ७४ कोटी १६ लाख ठेव असून ६० कोटी ३५ लाख रु. कर्जवाटप झालेली आहे. संस्थेस आर्थिकवर्षात १ कोटी १२ लाख १० हजार रूपये नफा झाला असुन सभासदांना ११ टक्के लाभांश दिला जाणार आहे.
प्रारंभी प्रतिमा पुजन आणि श्रध्दांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात झाली. संस्थेचे सरव्यवस्थापक संदिप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले. सदर सभेसाठी ठेवीदार, कर्जदार, सभासद, उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

