फलटण प्रतिनिधी – गुरूवर्य श्री. श्री. १००८ योगी महंत ब्रह्मचारी त्रिशुलनाथजी महाराज, पुणे कोंढवा व गुरूवर्य प्रकाशनाथजी महाराज यांचे उपस्थितीत ९ सर्कल, १६ फाटा खवळेवस्ती, साखरवाडी येथे बुधवार दिनांक, २६ फेब्रुवारी रोजी रात्रौ १२ वाजून, २६ मिनिटांनी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती विजय दादा खवळे मा. उपसरपंच सुरवडी, ( ता. फलटण ) यांनी दिली.

गेल्या ३७ वर्षांपासून येथे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी शिवलीला अमृताचे वाचन, पुजा शिव पुजा व शंख पुजा, रात्री १२.२७ ते १.२६ वा. तर वाचन गुरूवर्य विलास खवळे महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कै. दादा पांडुरंग खवळे यांचे परम मित्र प्रल्हादरावजी साळुंखे-पाटील, ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरूवर्य श्री. मोरे बाबा, गुरूवर्य श्री. मोहनदास बाबा, गुरूवर्य श्री. शेंडगे बाबा, गुरूवर्य सोपानलिंग पाजगे बाबा, गुरूवर्य श्री. राजगे बाबा, गुरूवर्य श्री. बाबासाहेब नरूटे बाबा, गुरूवर्य श्री. मारूती चव्हाण बाबा, गुरूवर्य श्री. भाऊसाहेब नजन बाबा, गुरूवर्य श्री. विष्णू सोळशे बाबा, गुरूवर्य श्री. लोखंडे महाराज, श्री. गुरूवर्य गजानन महाराज यांची विशेष उपस्थित असणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजक दिपक मोहिते, दळवी महाराज (मुंबई), विजय खुडे (आळंदी), आनंदा दुबळे (बहुज) काशिनाथ रिटे, संजय खवळे, महेश बाबर, दत्तू मदने, श्री. सचिन मदने, राजेंद्र शिंदे, पोपट धायगुडे, धोंडीराम शिंदे, अनिल जाधव, रमेश सातपुते, श्री. ज्ञानदेव साळवे, शहाजी जगदाळे, विकास जगताप, बापुराव मदने, सुनिल यादव, किसन सुळ, भिमराव राऊत, सुनिल बनकर आदी मान्यवर करणार आहेत. महाप्रसाद गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते २ असणार आहे. शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केली आहे.

