फलटण प्रतिनिधी :- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेणाऱ्या मोठ्या माशाला वाचविण्यासाठी साखरवाडी ता फलटण या भागातील आशा सेविकांना स्थानिक पदाधिकारी धमकावत असल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे.
दि ११ रोजी साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये ४० हुन अधिक महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली मात्र ज्या महिलांची प्रसूती सिझर पद्धतीने झाली आहे अशा महिलांकडून या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या अनिल कदम या वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रति सिझर १ हजार यादराप्रमाणे एक ते तीन हजार रुपये शस्त्रक्रियेच्या आधीच आशा सेविकांना घ्यायला लावून ते पैसे साखरवाडीचे वैदयकीय अधिकारी संतोष कोंडके यांच्याकडे जमा केले होते व पैसे दिल्यानंतरच या महिलांना भुलीची इंजेक्शन देण्यात आली ते पैसे अनिल कदम यांना संतोष कोंडके यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी कक्षात रोख स्वरूपात दिल्यानंतरच याठिकाणी महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली या धक्कादायक घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाले.
याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली व या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. याबाबत चौकशीचा सशेमिरा मागे लागून कारवाई होणार या भीतीने अनिल कदम याला वाचवण्यासाठी साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आशा सेविकांची तातडीने बैठक घेऊन ‘तुम्ही ज्या महिलांना शस्त्रक्रिकेसाठी घेऊन आला होता अशा महिलांकडून शस्त्रक्रियेसाठी आमच्याकडून कोणीही पैसे घेतले नाहीत’ असे लिहून घ्या या असा सज्जड दम या आशा सेविकांना दिला असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने सांगितले दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतले मोठ्या माश्याने व त्याला वाचवण्यासाठी छोटे मासे आशा सेविकांना वेठीस धरत असल्याने साखरवाडी सह परिसरात संताप व्यक्त होत आहे.
एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी
या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्यस्तरावरून चौकशी व्हावी आणि त्याकरिता एसआयटीच्या कडून तातडीने चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा घोटाळा फक्त साखरवाडी पुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
दबाव आणणाऱ्यांना निलंबित करा
सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असून चौकशी अधिकारी यांच्याशिवाय लेखी जबाब दाखल करून घेण्याचा अधिकार कोणासही नसताना दबावापोटी आशा सेविका संबंधित महिलांकडून लेखी स्वरूपात जबाब घेण्यात असल्याची माहिती मिळत असून चौकशी दरम्यान हस्तक्षेप करून दबाव आणणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आशा सेविका यांना निलीबित करण्याची मागणी जोर धरत आहे.

