नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद

फलटण – एकीकडे फलटण नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून निवडणुकीत उभे असणारे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार विविध प्रकारे प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सकाळी ६ वाजता विमानतळ परिसरात मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांशी विविध विषयावर संवाद साधला. 

सकाळी विमानतळ परिसरात अचानक भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या व खेळण्यास येणाऱ्या तरुणांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या समस्येबाबत विचारपूस केली. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी व तरुणांनी समशेरसिंह यांच्यापुढे फलटणमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व खेळासाठी सुसज्ज असे मैदान नसल्याचे सांगितले. यावेळी समशेरसिंह यांनी निश्चितच पुढील काही दिवसात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज बाग बगीचे व तरुणांना खेळण्यासाठी खेळाची मैदाने नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

समशेरसिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध भागात तसेच विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधत असून फलटण शहरातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या व अडचणी याबाबत माहिती घेत असून येणाऱ्या काळात फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून समस्या सोडवण्यावर कसा भर देण्यात येईल याकडे लक्ष देत आहेत.

फलटण शहरात मॉर्निंग वॉक दरम्यान आज अखेर कोणत्याही राजकीय नेत्यांनी नागरिकांच्या व तरुणांच्या समस्या ऐकून घेतल्याचे कधी पाहण्यात आले नाही. परंतु समस्येची जाण असणाऱ्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अचानक सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत प्रचार मोहीम अधिक गतीमान केली.विमानतळ परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना भेटून त्यांनी आपल्या योजना आणि विकासासाठीच्या आश्वासनांची माहिती दिली.

भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी त्यांनी आरोग्य, वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि महिला सुरक्षेसंदर्भात मते जाणून घेतली.नागरिकांमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भेट झाल्याने मुद्दे थेट मांडण्याची संधी मिळाल्याचा आनंद होता.

error: Content is protected !!