महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण : – फलटण शहरात सुरू असलेले अवैध दारूचे गुत्ते 1 जानेवारी पर्यंत बंद न झाल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संग्राम अहिवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्री,विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,फलटण शहरात फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूच्या धंद्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून महिला, लहान मुले व युवकांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. फलटण शहरात एक महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत त्यांची मुले अनाथ होऊन देशोधडीला लागत आहेत यावेळी दारू विक्रीमुळे शहरामध्ये गुंडगिरी वाढत चालली आहे यामुळे शहरातील अवैध दारू विक्री थांबवणे काळाची गरज बनली आहे असे निवेदनात म्हटले आहे
फलटण शहरात सुरू असलेले अवैध दारूचे गुत्ते 1 जानेवारी पर्यंत बंद न झाल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा येईल असा इशाराही संग्राम अहिवळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

