महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
सातारा:- सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जावळी तालुक्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टीमध्ये बारबाला नाचवल्या गेल्या. कहर म्हणजे हुल्लडबाजांनी पार्टीमध्ये दारु पिऊन धिंगाणा घातला असून बाराबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी पार पडली. या रेव्ह पार्टीमध्ये बारबारालांना बोलवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अश्लील पद्धतीने नृत्य करण्यात आले. तसेच या ठिकाणी हाणामारी सुद्धा झाली असून तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मागील तीन दिवसांपासून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत होत आहे. त्यामुळे पोलिसांचा कार्यतत्परतेवर प्रश्चचिन्ह निर्माण केले जात आहे. अनेक टिव्ही चॅनेल व वृत्तपत्र यांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.

याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कोणत्याही पोलीस बंदोबस्तात रेव्ह पार्टी झाली नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कारवाई केली जाईल, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.