पलपब सातारा साहित्य समूह आयोजित अजिंक्य साहित्यसंगम राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि पुरस्कार सोहळा संपन्न

सातारा प्रतिनिधी: – रविवार, ११ में रोजी सातारा येथील कोडोलीत ‘अजिंक्य साहित्यसंगम राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. ग्रंथ दिंडीच्यावेळी महिला मान्यवरांनी तुळशीचे रोप डोक्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत मिरवणून काढण्यात आली.

ग्रंथ दिंडीमध्ये १५० पेक्षा जास्त साहित्यिकांनी सहभाग नोंदवला.संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक मा.श्री.अनिल बोधे सर,उद्घाटक ज्येष्ठ लेखक मा.सुरेश शिंगटे,प्रमुख पाहुण्या मा.रेखा दीक्षित मॅडम,तसेच मा.श्री.प्रदीप कांबळे,ज्येष्ठ साहित्यिका अनिता नलगे मॅडम, मा.आमदार मनोज दादा घोरपडे यांचे बंधू संग्राम नाना घोरपडे,मा.आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी शिंदे ताई पाठ्यपुस्तक कवी. मा.हनुमंत चांदुगडे, मा.श्री.गणपतराव कणसे, मा.श्री.विजय वेटम, मा.श्री.प्रतीक मतकर, दिपक सोनवणे, दिपक पवार, विशाल पवार, वैशाली महाडिक, संगिता साळुंखे, विनायक भगत, अमरनाथ शिंदे, प्रथमेश निकम, मनिषा कदम, तानाजी चव्हाण, संजय जाधव, पत्रकार सुनील शेडगे, किरण पवार, अभयकुमार देशमुख, महेश पवार, एबीपी माझा न्यूज चॅनल पत्रकार इत्यादी तसेच पलपब पब्लिकेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.लीना पाटील, मा.श्री सिद्धार्थ पाटील तसेच आयोजक पलपब महाराष्ट्र अध्यक्ष मा.किरण तोडकर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री संदीप पवार, स्वागताध्यक्ष मा. विजय कदम आणि संयोजक पलपब सातारा कमेटी उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप मान्यवर यांच्या हस्ते प्रज्वलन करून. मा.विजय कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तसेच मा.विजय वेटम मान्यवरांची संक्षिप्त ओळख करून दिली.पलपब पब्लिकेशनच्या सर्वेसर्वा सौ.लीना पाटील यांनी सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रातिनिधिक अभंगधारा काव्य संग्रह,भटक्या,धर्मवाणी, शब्दगुंफण,चारुची कविता, सैलानी, वलाफोक,प्रेरणेची सावली या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.तसेच २०२४ मध्ये इ-बुक दिवाळी अंकामध्ये सहभागी झालेल्या कवी.लेखकांचे कविता,लेख, निबंध मागवून त्यात मध्ये नंबर काढण्यात आले होते.क्रमांक आलेल्या विजेत्या साहित्यिकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

पुस्तक प्रकाशनाबरोबरच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी पलपब प्राइड ऑफ भारत, एक्सलन्स अवॉर्ड, साहित्य भूषण, साहित्य प्रेरणा,साहित्य साधना जीवन गौरव, संत गाथा, या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.दुपारच्या दुसऱ्या सत्रात ३५ कवी / कवयित्रीने सहभाग नोंदवला होता.यावेळी काव्य संमेलन अतिशय सुंदर आणि रंगतदार रंगले होते.सहभागी झालेल्या कवींना सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष लेखक मा. प्रदीप कांबळे सर यांनी पलपब पब्लिकेशन संस्थेच्या वतीने हा राज्यस्तरीय साहित्य संमेलन सातारा येथे घेतल्याबद्दल शाल ,श्रीफळ तसेच सातारा कंदी पेढे देऊन कार्यक्रमाच्या पलपब संस्थापिका सौ. लीना पाटील

तसेच मा.सिद्धार्थ पाटील,डायरेक्टर कुमारी सेजल पाटील तसेच आयोजक पलपब महाराष्ट्र अधयक मा.किरण तोडकर सर , पलपब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.संदीप पवार सर या सर्वांना देवून त्याचा कार्याचा गौरव करण्यात आले.जेष्ठ लेखक अनिल बोधे , जेष्ठ लेखक सुरेश शिंगटे, जेष्ठ लेखक प्रदिप कांबळे यांच्या साहित्यिक भाषणाने कवी कवयित्री, लेखक ,साहित्यिक रसिकांची मने जिंकली या वेळेत जवळपास ३०० साहित्यिक प्रेमी हजर होते व या पलपब सातारा कार्यकारिणीने सर्वांची जेवण, नाष्टा, चहा, पाण्याची उत्तम सोय केली होती.

कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून उत्कृष्ट सूत्रसंचालन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे मा.विजय वेटम, मा.अजित शिरसागर, मा.सुहास राऊत, मा.प्रतीक मतकर, सौ.सुरक्षा पाटील हे होते. कार्यक्रमाच्या शेवटी सांगता आभार मानून मा.सुहास राऊत केले. आलेल्या सर्व श्रोत्यांचे, कवींचे, साहित्यिकांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

error: Content is protected !!