दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी मध्ये कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस उत्सवात साजरा

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l

फलटण तालुक्यातील दी एम्रल्ड प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडी गुरूवार दिनांक १ रोजी कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्योजक पृथ्वीराज रणवरे व पिंपळवाडी विद्यालय माजी शिक्षिका सुरेखा पृथ्वीराज रणवरे उपस्थित होत्या.

यावेळी प्रथमतः प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. विद्या भिसे यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

या कार्यक्रमात शाळेच्या इन्चार्ज मोनाली कुलकर्णी, शिवगंगा पवार,वर्षा खोमणे, पल्लवी भापकर, शिरिन मुलाणी,अफसाना सय्यद ,विद्या भिसे ,रोहिणी ठोंबरे, रूपाली बनकर, पुनम शिंदे, सुषमा गायकवाड ,हा सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!