फलटण प्रतिनिधी:- आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची सुरुवात प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गतप्रशालेच्या प्रवेशद्वारापासून प्रशालेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आनंदी व उत्साही वातावरणात वाजत गाजत औक्षण करून करण्यात आले.

नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर एक समाधानी वृत्ती दिसून आली व त्यांनी त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेली प्रशालेची निवड ही योग्य आहे असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले व काही पालकांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपले मत व समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात सौ तगारे एस एम व श्री वाघ जी बी यांनी स्वागत गीत गायन करून केली.

प्रशालेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्रभारी प्राचार्य मा श्री पी डी घनवट यांचे हस्ते लेखणी देऊन व पालकांना वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय प्रमुख मा अमरसिंह संताजीराव सूर्यवंशी (बेडके)यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक प्रशालेच्या वतीने वाटप करण्यात आली. प्रशालेमध्ये राबवण्यात येणाऱ्या गुरुजी AIR आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश वाटप, मोफत सायकल वाटप, मोफत एस टी पास योजना, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, MHT-CET मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी- पालक समुपदेशन केंद्र या विविध उपक्रमांची माहिती प्रा यादव एस डी यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.
कर्मयोगी कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपले पूर्ण जीवन शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले. आधुनिक काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सुलभरीत्या निर्माण होण्यासाठी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांनी अथक परिश्रम करून विविध कोर्सेस या संस्थेत सुरू केले आहेत. संस्थेचे मानद सचिव मा डॉ सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) व नियामक मंडळाचे सदस्य मा महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे.
याप्रसंगी नवागत विद्यार्थी व पालकांना प्रशालेतील विविध उपक्रमांची व विभागांची ओळख व माहिती शिक्षकांनी करून दिली. प्रशालेच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते त्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेचे प्रभारी प्राचार्य मा प्राध्यापक घनवट पी.डी.व सर्व विभाग प्रमुख यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तगारे एस एम यांनी केले तर आभार प्रा सौ अडसूळ एस सी यांनी मानले.