सुसंस्कारित पिढी घडविण्याचे उत्कृष्ट कार्य पी.एम.श्री.नगरपालिका शाळा क्र ५ वाई करत आहे; तहसीलदार सोनाली मेटकरी-शिंदे

वाई :- शिष्यवृत्तीच्या सर्वोत्तम निकालाबरोबर सुसंस्कारित पिढी घडविण्याचे उत्कृष्ट कार्य पी.एम.श्री.नगरपालिका शाळा क्र ५ वाई करत असल्याचे प्रतिपादन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी-शिंदे यांनी केले.२०२४ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या.

शाळेची गुणवत्ता पाहूनच मी माझ्या मुलीस या शाळेत प्रवेश घेतला हे त्यांनी आवर्जून सांगितले.या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकारामशेठ जेधे व गटशिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे आपल्या भाषणात कौतुक करत शाळेच्या निकालाबाबत गौरवोद्गार काढले.प्रास्ताविकात वरिष्ठ मुख्याध्यापक विकास जाधव यांनी सर्व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नातूनच या वर्षी शाळेची केंद्र सरकारमार्फत निवडक PMSHRI स्कूल मध्ये शाळेची निवड झाली असून ,मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक आल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत आलेले २९ विद्यार्थी , ५ आदर्श विद्यार्थी व वर्गशिक्षक साधना जाधव,जयंत धायगुडे, तृप्ती मोहिते,वृषाली कासवेद,रेश्मा मुजावर व मुख्याध्यापक विकास जाधव यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.पूर्व प्राथमिक विभागाच्या माधुरी फाटक, छाया मर्ढेकर, शोभा घाडगे,रेणुसे, सुतार, घोरपडे व सुधा सकुंडे यांचाही सत्कार करणेत आला.या वेळी मा. नगरसेवक प्रदिपदादा चोरगे, विद्यार्थ्यांनी स्वराली कावडे, युगा गायकवाड, शिक्षक जयंत धायगुडे, तृप्ती मोहिते, पालक ज्योती पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी वैशाली शिंदे,अजित वनारसे,विकास कृष्णा जाधव,रणदिवे सर,अमोल काळे,विलास कोळी व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष धुरगुडे यांनी केले.विद्यार्थी यादि वाचन मनीषा देशपांडे व नवनाथ शिंदे यांनी केले.आभार नवनाथ शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!