माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी घेतली समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भेट, चर्चेला उधाण

फलटण – शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची फलटण येथे भेट घेतली. या भेटीमुळे फलटण शहरासह तालुक्यात राजकीय चर्चा सुरू होती.

‘काय झाडी, काय डोंगर’ फेम शहाजी पाटील यांनी अचानक फलटण येथे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चेतन सुभाषराव शिंदे हे उपस्थित होते. फलटण नगर परिषद नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाकडून कोण उमेदवार असेल हे आजुन निश्चित झाले नाही. आज फॉर्म भरण्याच्या चौथ्या दिवशी अखेर एकाही उमेदवाराने नगराध्यक्ष अथवा नगरसेवक पदाकरता फॉर्म भरला नाही.

दोन्ही मुख्य गटाकडून नगराध्यक्ष पदाकरता चाचपणी सुरू आहे. फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची अचानक भेट घेतली. अचानक घेतलेल्या भेटीवेळी नक्की कोणत्या विषयावर चर्चा दोघांमध्ये घडल्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसली तरी संपूर्ण शहरात व तालुक्यात दोघांच्या भेटीबाबत चर्चा रंगल्या होत्या.

माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि कैलासवासी लोकनेते माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा फार जुना विशेष स्नेह होता. फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप पक्षाकडे पक्षाकडे नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी मागितली आहे. पक्षाकडून अद्याप नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी जाहीर झाली नसल्याने नगराध्यक्ष पदाकरता पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष पदाकरिता फॉर्म भरण्याची मुदत चार दिवस राहिली आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.

एकीकडे राजकीय जाणकारांनी अचानक घेतलेल्या भेटीमुळे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षात व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात दररोज सुरू असलेल्या इन्कमिग मुळे पुढचा नंबर कुणाचा असेल याची दिवसभर तालुक्यात चर्चा होत आहेत.

error: Content is protected !!