महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ येथे गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

खंडाळा :- महापुरूषाचा अपमान केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५/१२/२०२४ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास केसूर्डी गावच्या हद्दीत असलेली एल्जिन ग्लोबल इंडिया केसूर्डी या कंपनीमध्ये पुरुष टॉयलेट मधील चार नंबरचा टॉयलेट मध्ये आतील बाजूस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने महापुरुषांची बदनामी होईल असा मजकूर मार्करने या पेनाने लिहिलेला आहे. म्हणून त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्यादी भास्कर पोमण यांनी शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत.

error: Content is protected !!