शिरवळ:- सध्या माणुसकी हरवत चालली आहे आणि प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे, असे असतानाच एक सुखद घटना घडली आहे. कपड्यांच्या खिशामध्ये सापडलेली १ सोन्याची आणि १ चांदीची अंगठी प्रामाणिकपणे परत करणारा लाँड्रीचालक याची शिरवळ भागात चर्चा सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भादे गावातील ह.भ.प. संजय शिवराम साळुंखे यांनी त्यांची कपडे ८ दिवसांपूर्वी सोमराज (पांडू) कदम (रा.भादे) यांच्याकडे इस्त्री साठी दिली असता त्या कपड्यांच्या खिशामध्ये १ सोन्याची आणि १ चांदीची अंगठी राहिली होती, त्यांनीं घरात सर्व ठिकाणी शोधली असता त्यांना सापडली नाही, परंतु प्रामाणिक असलेले सोमराज (पांडू) कदम यांनी त्यांच्या दोन्ही अंगठ्या त्यांना परत करून समाजाला एक अनोखा संदेश दिला आहे. पूर्ण गावातून त्यांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे कौतुक होत आहे.
