महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण:- मी तुम्हाला भयमुक्त आणि दहशत मुक्त फलटण देण्यासाठी मी आलो आहे.शिवसेनेच्या अनिकेतराजेंना सत्ता द्या आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा हा एकनाथ शिंदे शब्दाला जागणारा आहे.एक सुरक्षित आणि सुसंस्कृत सुंदर फलटण आपल्याला उभं करायचं आहे आणि शिवसेनेचे शिलेदार नगराध्यक्ष अनिकेतराजेंच्या नेतृत्वाखाली या स्वप्नातली फलटण नगरी उभी केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फलटण येथील सभेत केले.

यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे, कृषी उत्पन बाजार समिती सभापती रघुनाथराजे, शिवसेनेचे जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी आहे मी विनम्र अभिवादन करतो खर म्हणजे मी आज इथं आलो होतो सभा घेण्यासाठी नाही, तर फलटणच्या आणि तुमच्या स्वाभिमानासाठी आणि लाडक्या बहिण भावाच्या उज्वल भविष्यासाठी आलोय मी तुम्हाला भयमुक्त आणि दहशत मुक्त फलटण देण्यासाठी मी आलो आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजेंना व त्यांच्याबरोबर असलेले सर्व पॅनल या सर्व नगरसेवकांना या सर्व टीमला विजयी करा म्हणून विनंती करायला आलोय आपल्याला “फलटण च नाव देशभरात गाजे, धनुष्यबाणाच बटन दाबा निवडून आणा श्रीमंत अनिकेतराजे”, एवढी फौज रस्त्यावर उतरली आणि यांनी जवळच्या लोकांना सांगितलं धनुष्यबाणाला मतदान करा अनिकेतराजेंना मतदान करा तर मला वाटतं समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनिकेतराजें यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व उमेदवार जाहीर गुलाल उधळत त्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, ” शिवसेनेच धनुष्यबाण निघेल सुसाट आणि समोरच्याना करेल भुईसपाट” फलटण नगरपरिषद म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ९१ साली नगराध्यक्ष झालेल्या रामराजेंनी राज्याच्या राजकारणात मोठी झेप घेतली ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते राज्याचे जलसंपदा मंत्री होते अनेक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि विधान परिषदेचे ते सभापती देखील झाले सर्वोच्च असे पद त्याने भूषवले काही जणांनी कट कारस्थाने केली त्यांच्या विरोधात पण मी एक सांगतो “शेर कभी बुढा नही होता है चाहे ओ जंगल का हो या राजनीति का हो शेर शेर ही रहता है” रामराजांनी सुरू केलेली समाजसेवा त्यांनी सुरू केलेल्या विकास पर्व आपल्याला श्रीमंत अनिकेतराजेंच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पुढे न्यायच आहे. अनिकेत राजे उच्चशिक्षित आहेत सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली आहे ते अभ्यासू असल्यामुळे रखडलेली सर्व काम ते पूर्ण करतील असा विश्वास तुम्हाला मी द्यायला मी आलो जनसेवेच्या चार पिढ्यांचा वारसा लाभलेलं हे राजे कुटुंबीय निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे असे ते म्हणाले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मला विचाराल तर मी सांगेन आजचा दिवस हा फलटणवासीयांसाठी शुभ संकेत आहे शुभ शकुन आहे यालाच म्हणतात दुधात साखर किंवा सोने पे सुहागा म्हणून सुदैवाने प्रग्लब नेतृत्व घराण्याकडून फलटणला आधीच मिळाले त्यात आता शिवसेनेचा हा भगवा रंग मिसळला आणि त्यामुळे हा भगवा रंग विकासाचा आहे प्रगतीचा आहे समृद्धीचा आहे. तुम्ही धनुष्य बाणाला मतदान करा बाकी विकासाची जबाबदारी माझी, तुम्ही इतक्या वर्ष आजमावल आहे, इतराना सत्ता दिली आहे. आता एकदा शिवसेनेच्या अनिकेतराजेंना महायुतीच्या अनिकेत राजेंना सत्ता द्या आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा हा एकनाथ शिंदे शब्दाला जागणारा आहे. एक सुरक्षित आणि सुसंकृत सुंदर फलटण आपल्याला उभं करायचं आहे आणि शिवसेनेचे शिलेदार नगराध्यक्ष अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखाली या स्वप्नातली फलटण नगरी उभी केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की,मघाशी आपल्या रामराजे यांनी सांगितलं की तुम्ही शांत असता कसे राहता, कसं वागता, राजे मी अगदी शांत आहे पण जेव्हा कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तेव्हा मी करेक्ट कार्यक्रम करतो. 2022 साली महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी बघितलं “हू इज एकनाथ शिंदे” माझ्या बरोबर 50 आमदार सत्तेवर पाणी सोडून निघालो, सत्ता सोडली कोण सत्ता सोडत पण आम्ही सत्ता सोडली, आम्ही सत्ता सोडून निघून गेलो का तर या राज्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब सांगायचे त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली या महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात केला आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला 2022 ला आणि या महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार आणलं.अडीच वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे हा राज्यभर फिरला अनेक रखडलेले विकास प्रकल्प पुढे आणले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रामराजे साक्षीदार आहेत त्यांचा फार प्रग्लब अनुभव आहे अडीच वर्षात सगळे प्रकल्प, रस्ते प्रकल्प, सगळे प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झाल्या नव्हत्या या योजनेमध्ये एकनाथ शिंदे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे “लाडकी बहीण योजना” त्यामध्ये अनेक लोकांनी खोडे घातले योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे शब्दाला जागतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट कोणीही मायक्लाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
रामराजे हे अनुभवी प्रग्लब नेते आहेत हे ज्यावेळी निर्णय घेतात तेव्हा मला काय मिळेल माझ्या परिवाराला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल या फलटणला काय मिळेल हा विचार रामराजे यांनी केला. मी जसं धाडसी निर्णय घेतो तसेच रामराजेंनी धाडसी निर्णय घेतला मी त्याचं अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. शिवसेना हा एक कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही मालक नाही. आज मला अभिमान आहे फलटणमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम रामराजे आणि सर्व मंडळी या ठिकाणी करतात मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.मला रामराजे म्हणाले मी कमी बोलतो, मी जास्ती ऐकतो आणि जास्तीचे काम करतो कारण खऱ्या अर्थाने माझा कार्यकर्त्याचा स्वभाव आहे जिथं संकट तिथ शिवसेना जिथं आपत्ती तिथं हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही मग तिथे पूर असो काही असो आणि म्हणून एवढ्या लोक जे सोबत येत आहेत त्यामुळेच येतात. मी कधी घाबरलो नाही कारण बाळासाहेबांचा मी सच्चा सैनिक आहे. किसीसे नही डरता हे एकनाथ शिंदे जो बोलता है वही करता है जो बोलता वही करता है आणि म्हणून सगळे लोक येतात प्रवाहात येताय सोबत येत आहेत आणि या फलटणच्या विकासासाठी जे काही या ठिकाणी दृश्य पाहतोय मी तुम्ही एकदा संधी द्या त्या संधीचा अनिकेतराजे आणि टीम सोनं केल्याशिवाय राहणार नाही.
फलटण शहरातले सगळे रस्ते गल्ली बोळातील रस्ते खड्डे मुक्त करा अशी मागणी आहे. मी एकच सांगतो आचारसंहिता संपल्यानंतर सर्व रस्ते चकाचक केले जातील. फलटणचे राजे कुटुंबीयांनी त्यांच्या असणाऱ्या मालकीच्या जमिनी वरती राहणाऱ्या लोकांना कधी त्रास दिला नाही. राजा हा प्रजेची काळजी घेणारा असतो त्याचा सभाळ घेणारा असतो यापुढे कधी त्रास दिला जाणार नाही. झोपडपट्टी रहिवाशांना अन्य स्कीम राबवून हक्काची पक्की घर करून द्या म्हणून मागणी केली आहे. मी सांगतो तुमच्या एकनाथ शिंदे कडे गृहनिर्माण विभाग पण आहे, नगर विकास पण आहे, एस.आर.ये आहे, माढा आहे राजेंची परवानगी घेऊन मी सर्व काही करणार आहे.
राजे कुटुंब आणि इथं या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मी आपल्याला सांगतो मला मघाशी काही अर्ज आले काही अर्ज मला दिले काही लाडक्या बहिणींवर होणारे अत्याचार अन्याय यामध्ये मी त्यांची नाव घेत नाही तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होतात आमच्यावर अन्याय होतोय खोट्या तक्रारी देतात पण मी अधिकाऱ्यांना सांगतो कुठलही बेकायदेशीर काम करू नका खोट्या तक्रारीला संधी देऊ नका आणि कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळी पडू नका आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे. मग कोण काय काय करत होतो ते सगळं मला माहित आहे. कोणी काय काय केलं ते मला माहित आहे. मी शांत आहे चुपचाप आहे मला शांत राहू द्यात मी कोणाला त्रास देत नाही मी कुणा आडवा जात नाही पण माझ्यात आडवा आला तर मी सोडत नाही.
हे सर्व सामान्यांचे सरकार गोरगरिबांचं सरकार आहे अन्यायचं नाही आणि म्हणून अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही इथं काहीतरी दुर्दैवी घटना घडली महिला डॉक्टर वर अन्याय होणार नाही मी सांगतो कुटुंबीयांना माझा शब्द आहे ती लाडकी बहीण तुमची नाही एकनाथ शिंदे ची पण लाडकी बहीण आहे. एकनाथ शिंदे बोलतो कमी पण काम करून दाखवतो मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो माझा मुलगा डॉक्टर आहे खासदार आहे मी डॉक्टर नसतो तरी ऑपरेशन करतो मी, विदाऊट डॉक्टर छोटे मोठे ऑपरेशन करून टाकतो. म्हणून 2022 मध्ये टांगा पलटी घोडे फरार झाले. आपण सगळे साक्षीदार आहात की आपण ज्या पद्धतीने कामकाज केल आणि अडीच वर्षाच्या काळात एकाही बेकसुर माणसाला कधी त्रास नाही झाला. हे सरकार आपलं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण केलं. २४ तास काम केल अडीच वर्षात हा एकनाथ शिंदे अडीच तासापेक्षा जास्त झोपला नाही म्हणून आमचा अजेंडा खुर्चीचा नाही आमचा अजेंडा विकासाचा आहे.
ज्या लोकांनी खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधणे सोडवणे आहे.फलटण येथील औद्योगिक वसाहतीची विस्तार प्रक्रिया प्रलंबित आहे त्यासाठी पाचशे एकर अधिक जागा आवश्यक आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आहेत त्याच्याबरोबर जॉईन बैठक लावा. फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या 50 बेड व वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टर आणि अन्यथा कार्यरत आहे या रुग्णालयाचा विस्तार 100 पर्यंत करू त्यानुसार डॉक्टर स्टाफ देण्यात येईल. फलटण शहरात वाहतूक कोंडी होत आहे ती टाळण्यासाठी चौकांच विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करावं रस्त्यावरून उड्डाण पुलाची मागणी होत आहे. चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नल बसवावे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे वृक्ष संवर्धन काम लवकरच सुरू होईल. आचारसहिता झाल्या झाल्या फलटण शहरात ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक वारसा जतन व वाढवण्यासाठी येथील पुरातन इमारतींचे जिर्णोद्धार व पुनरस्थापना करावी विशेषता शहराच्या जुन्या तटबंदीची पुनस्थापना शहराच्या चारी दिशाला प्रवेशद्वारे उभारले जावे अशी मागणी होत आहे. जुन्नरला एमआयडीसीच्या माध्यमातून प्रवेशद्वारे उभारली जात आहे. त्या धरतीवर फलटणमधील शहराच्या चारही दिशेला प्रवेशद्वारे उभारू.
“नो रीजन ऑन स्पॉट डिसिजन” मी तर उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे काळजी करू नका रिंगरोडची व्यवस्था करू. दत्तनगर, शिवाजीनगर, इंदिरानगर वसाहती निर्माण करू, हडको मधील रहिवाशांचा करार काय संपलेला आहे त्याचा रहिवाशांचा नव्याने 99 वर्षाचा फेरकरार करून दिला जाईल. मी जे काय बोलतो ते पूर्णपणे माझ्या लक्षात असतं आणि पूर्णपणे विचारांती बोलतो आणि एकदा शब्द दिला की मी तो शब्द कधी फिरवत नाही. शब्द पाळणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे.
मी आपल्याला एवढेच सांगतो फलटणकराना काही कमी पडू देणार नाही जे जे काही आतापर्यंत झालं नाही ते सगळं होईल माझी कामाची पद्धत आहे. मी आता आपल्याला एवढं सांगतोय इथे रामराजे आहेत त्यांनी सगळे राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून फलटणकरांच्या विकासासाठी हे मोठं पाऊल उचललेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण या ठिकाणी त्यांनी विकास डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून आपला पण विकासाचा अजेंडा आहे. शिवसेना म्हणजे विकास आणि विकासाची आपण भूमिका घेऊन पुढे चाललोय म्हणून हे राज्य नंबर एकला आहे.
फलटणचे नाव जगाच्या नकाशावर आलं पाहिजे. रामराजेंच्या माध्यमातून या अनिकेत राजेंच्या माध्यमातून अशा प्रकारचा पण काम करूया मी आपल्याला एवढे सांगेन मी काय कमवलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. रामराजेंचा स्वभाव पण फार मी जवळून पाहिला ते खुर्चीवर बसलेले असतात पीठासीन अधिकारी म्हणून ते बघतात ते शांत असतात कोण जास्ती मस्ती करतोय कोण काय करतोय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याचा बरोबर आवाज बंद करतात. त्यांच्या हातामध्ये तिथल बटन असतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही उपमुख्यमंत्री झालो आहे. रामराजेंच्या कामाची पद्धत ते बोलतात कमी आणि कार्यक्रम जास्ती करतात आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण घेतलेला निर्णय या फलटणला विकासाकडे घेऊन जाईल.
फलटण छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी भूमी आहे. अशा या भूमीमध्ये आपण ही सभा घेतोय आणि फलटण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सोबत असलेल्या सगळ्यांचा भगवा फडकला पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो शिवसेना आणि मित्र पक्ष आघाडीचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहेत. एकूण एक उमेदवार आपल्याला विजयी करायचा आहे सगळ्यांना वाजत गाजत नगरपालिकेत पाठवायचं आहे इतिहास घडवायचा आहे आणि मी नेहमी सांगतो “ज्याच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला” या आघाडी ला हराणा मुश्किल नही नामुमकीन है आणि म्हणून शिवसेना आणि आघाडी हे आपल्याला जिंकावायची आहे आणि आपल्याला विकासाला चालना करून द्यायची आहे.मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण मला जाणीव आहे गरिबीची गरिबाच्या दुःखाची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि आज एक राजेघराणं आपल्यासोबत आहे.
त्या घराण्याचा आणि अनुभव रामराजेंचा प्रग्लब अनुभव त्यांच्या सर्व कुटुंबीयांचा अनुभव या फलटणला फलटणमध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भर सभेत मंत्र्यांना दिले आदेश
फलटण येथील एमआयडीसी चा विस्तार व्हावा यासाठी प्रस्ताव प्रलंबित आहे ढवळेवाडी, नांदल,सुरवडी व परिसरातील शेतकऱ्यांशी बोलणी सुरू आहेत यामध्ये मार्ग काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला त्यांनी थेट फलटण मध्ये येऊन बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे फोन वरून आश्वासन दिले.या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फलटण साठी १०० बेड चे विस्तारित सुसज्ज हॉस्पिटल करण्याची सूचना दिली असता त्यांनीही निवडणूक संपताच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

