
फलटण प्रतिनिधी :- जाधववाडी तालुका फलटण येथील धनगर समाजाचे जागृत देवस्थान श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम देऊन श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
कुरवली येथील वृद्ध आश्रम तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय व ताथवडा येथील सद्गुरु गाडगे महाराज आश्रम शाळा या संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयाची भरीव अशी आर्थिक मदत श्री. बिरदेव ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे.श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक दत्ता चोरमले, सचिव सुरेश पोपटराव चोरमले, खजिनदार विष्णू चोरमले, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अविनाश चोरमले, नेताजी चोरमले, विश्वस्त सुरेश चोरमले, विश्वस्त विठ्ठलराव चोरमले इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा धनादेश देण्यात आला आहे. श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट हे सातारा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे देवस्थान ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली जाते व अनेकांना मदतीचा हातही दिला जातो.