फलटण : श्री दत्त इंडिया साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीत कोठेही कमी पडणार नाही यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी निश्चिंत राहावे, अशी ग्वाही प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.

शेतकरी सभासदाना सहकार्य करत चांगला किफायतशीर दर देण्याची भूमिका श्री दत्त इंडिया कारखान्याची आहे. जिल्हाधिकारी सातारा येथील बैठकीत एफआरपी नुसार दर २६५० प्रति टन इतका येत असल्याने सर्वानुमते एफ आर पी अधिक २०० रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार २८५० दर जाहीर केला होता, परंतु दोन ते तीन दिवसात श्री दत्त इंडिया साखर कारखाना २८५० या दरावर न थांबता तालुक्यातील ईतर कारखान्यांप्रमाणे जास्तीत जास्त दर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांराना देणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांरानी दराबाबत निश्चित रहावे श्री दत्त इंडिया साखर कारखान्यास ऊस घालावा असे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.मागील काळात श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची परंपरा ठेवली असून यापुढेही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसास जास्तीस जास्त दर देण्यास श्री दत्त इंडिया साखर कारखाना कटिबध्द आहे. लवकरच शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न श्री दत्त इंडिया कारखान्याकडून होणार असल्याचे अजितराव जगताप यांनी सांगितले.