फलटण :- श्री दत्त इंडिया साखर कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे.

श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा दर एफआरपी नुसार २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे मात्र जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दिलेला दर व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी याचा सकारात्मक विचार करून आमचा कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार आहे.

मागील काळात श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची परंपरा ठेवली असून यापुढेही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसास जास्तीस जास्त दर देण्यास श्री दत्त इंडिया साखर कारखाना कटिबध्द आहे असे श्री दत्त इंडिया कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.मागील चार हंगामामध्ये श्री दत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्यामध्ये कधीही कमी पडला नसून भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना अधिका अधिक दर देण्याचा आमच्या कारखान्याचा प्रयत्न राहणार असून फलटण तालुक्यासह तालुक्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला गाळपास देण्याचे आवाहन त्यांनी केले.