उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल, मारकडवाडी गावात बॅलेट मतदान प्रकरणी गुन्हे दाखल

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपर मतदान प्रकरणी अजूनही गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरूच आहे. शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

माळशिरच्या मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मारकडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात मंळवारी संध्याकाळीच गुन्हे दाखल झाले होते.तर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव जानकारांसह 89 अज्ञात आणि 100 ते 200 इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.

Oplus_131072

आमदार उत्तमराव जानकर आणि ग्रामस्थांवर बीएनएस 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!