पुणे प्रतिनीधी:-एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या “सचिव” पदी संचालक रविंद्र ननवरे यांची तर “खजिनदार” पदी संचालक कल्याण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

एस.ई.ए(एम एस ई बी)को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,पुणे सोसायटीच्या रिक्त सचिव व खजिनदार या पदासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या कार्यालयाकडून दिनांक ९ रोजी निवडणूक कार्यक्रम निश्चित केला होता.त्यानुसार रमाकांत बनाईत, सहाय्यक सहकारी अधिकारी अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे अध्यक्षतेखाली सोसायटी कार्यालयात सभा संपन्न झाली.

या सभेमध्ये संस्थेचे संचालक रविंद्र ननवरे यांची “सचिव” पदी बिनविरोध निवड झाली. तसेच संचालक कल्याण जाधव यांची “खजिनदार” पदी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल दोघांचेही अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.