आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूलची सुवर्णकन्या समृद्धी शिंदे हिची भारतीय संघात निवड

वाई :- बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने रोहतक हरियाणा येथे घेण्यात आलेल्याचाचणी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारची खेळाडू समृद्धी सतीश शिंदे हिची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी साठी भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे.

सातारा जिल्ह्याची डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारची इ ७ वी अ मधील सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटन आणि सातारा बॉक्सिंग अकॅडमी सुवर्णपदक विजेती खेळाडू समृद्धी सतीश शिंदे 52 ते 55 किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने रोहतक हरियाणा येथे घेण्यात आलेल्या भारतीय संघ निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सेमी फायनल अरुणाचल प्रदेश तर फायनल सामन्यात हरियाणा खेळाडूंना पराभूत करत देशात प्रथम क्रमांक मिळवला.

वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने अमन जॉर्डन येथे दिनांक 17 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान होणाऱ्या 15 वर्षा खालील मुलीच्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी साठी भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप यांचे व प्रशालेतील क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर गुरव सर यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या सुवर्ण व ऐतिहासिक यशाबद्दल समृद्धीचे आई-वडिलांचे देखील शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे विश्वस्त अनंत जोशी, शालेय समिती सदस्य सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे, शाळा प्रमुखा सुजाता पाटील, उपशालाप्रमुख दत्ता भोसले,पर्यवेक्षक जनार्दन नाईक , अनिता कदम, डॉ. कविता गायकवाड, राजेश सातपुते तसेच शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

error: Content is protected !!