फलटण :- बारामतीहुन कोल्हापूरला जाणारी एसटी बस एम.च.१४.बी.टी ४९७१ ही बस फलटण जवळ चार किमी अंतरावर बारामती फलटण मार्गावर बारामती बाजूला पूर्ण पणे जळून खाक झाली ही बस सीएनजी बस होती दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास बस ने पेट घेतला असून एसटी बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे पेट घेतलेली एसटी त्वरित रस्त्याच्या एका बाजूला घेतली सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप एसटी बस मधून बाहेर काढण्यात वाहक व चालक यांच्या सोबत स्थानिकांना यश आल्याने मोठी जीवितहानी टळली असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

बारामती वरून सुटलेली एसटी बस मध्ये एकूण ३६ प्रवाशी प्रवास करत होते यामध्ये महिला २० पुरुष ९ बालक २ आणि जेष्ठ नागरिक ४ आणि दिव्यांग महिला १ असे एकूण ३६ प्रवाशी प्रवास करत होते. बस ने पेट घेतल्या नंतर बाहेरील मदत करणाऱ्या नागरिकांनी काचा फोडून सर्व प्रवाशी व त्यांचे साहित्य बाहेर काढले एका प्रवाशाची प्रवास बॅग जळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बारामती फलटण मार्गावरून धावणारी एसटी बसने पेट घेतल्याने महामार्गावर आगीचा डोंब उठला होता त्यामुळे महामार्गावरून वाहणाऱ्या इतर वाहनांनी सुरक्षित अंतर ठेवत प्रसंगावधान दाखवले परंतू पेट घेतलेली एसटी बस मोठं मोठ्या आगीच्या ज्वाळा सह आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस आधिकरी काही वेळात पोहचले होते या पूर्वी फलटण नगर पालिकेला अग्निशमन गाडी पाठवण्याची विनंतीही फलटण ग्रामिणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केली होती काही वेळातच फलटण पालिकेचा अग्निशमन दाखल झाला एसटी बसला लागलेली आग विझवली.

एसटी बंद पडणे ,पंक्चर होणे आणि इतर तांत्रिक कारणाने सतत प्रवाशांना त्रास होत असतो परंतू एसटी बसने पेट घेतल्याची या मार्गावरची ही पहिलीच घटना आहे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो याचा प्रत्यय आज फलटण बारामती मार्गावरच्या या थराराने सर्वांना आला या वेळी फलटण बारामती महामार्ग काही काळ पोलिस प्रशासनाने बंद ठेवला होता.