फलटण प्रतिनीधी:- फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून त्याचा सर्व सामान्य नागरिकांना व विशेषता लहान मुलांना फार त्रास होत आहे शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने करावा अशी मागणी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केली आहे.
शहरातील चौका चौकात 10 ते 15 कुत्र्यांचे टोळके व भर रहदारीचे चौकात बेवारस जनावरांचे कळप बसलेले असतात त्यांचा वाहन चालकाना खूप त्रास होत आहे आता तर ही जनावरे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकावर हल्ला करू लागले आहेत त्यामुळे एखाद्या नागरिकाचे जीवास धोका होऊ शकतो नागरिकाचा किंवा एखादे लहान मुलांचा जीव गेल्या वर नगर पालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे काय? असा सवाल प्रशासनाला माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी विचारला आहे.
फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा नगर पालिकेने ताबडतोब आठ दिवसाचे आत बंदोबस्त करावा अन्यथा भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना तसेच मित्र पक्ष या महायुतीचे मार्फत नगर पालिके समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.

