तडवळे ता.फलटण येथे चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

तरडगाव(संजय किकले):- तडवळे ता.फलटण येथील चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह ७५० ज्ञानेश्वरी वाचकांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये संपन्न होत असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवाला समोर ठेवून 750 ज्ञानेश्वरी वाचकांचा महासंकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्णत्वास येत आहे.

अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषात पुढील प्रमाणे, दि. ५ डिसेंबर ते १२ डिसेबर पर्यंत दररोज आपल्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 4 ते 6 काकडा आरती, 7:30 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी 4:30 ते 5:30 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा,5:30 ते 6:30 हरिपाठ, आणि 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन सेवा आणि त्यानंतर नऊ वाजता येणाऱ्या सर्व भाविकाकरिता महाप्रसाद अशा प्रकारच्या उत्सवाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळ तडवळे आणि श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ तडवळे विवीध मंडळे या सर्वांच्या संयोजनातून करण्यात आलेला आहे.

सप्ताह परीपुर्णतेसाठी हभप अनिल महाराज कुंभार हभप कुमार महाराज खराडे हभप सचिन महाराज मदने हभप दत्ता महाराज खराडे हभप वैष्णव महाराज भोसले व ग्रामस्थ,गावातील विविध मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

सप्ताह कालावधी मध्ये 4 ते 5 ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा प्रवक्ते हभप कुमार खराडे यांचे वाणीतुन ऐकण्यास मिळणार आहे.रात्री 7 ते 9 महत्त्यांची किर्तन सेवा हभप महादेव महाराज राऊत, हभप ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे,हभप कृष्णाजी महाराज नवले,हभप कन्होबा महाराज देहूकर, हभप गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर, हभप पोपट महाराज पाटील,हभप राम महाराज डोंगर,हभप जयवंत महाराज बोधले यांचे काला किर्तनाने सांगता होऊन नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!