खंडाळा:- दिनांक १८ डिसेंबर रोजी केए ३२ डी २२०० या ट्रकला पहाटेच्या सुमारास एका १४ चाकी ट्रकने मागून येऊन धडक दिली.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून धडक दिलेल्या ट्रकचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार असून तो ट्रक लोणंद शिरवळ रस्त्यावरील शेडगेवाडी येथे धडकलेल्या अवस्थेमध्ये उभा आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा होत आहे, अपघात होऊन बारा तास उलटून गेले तरी अद्याप तो ट्रक लोणंद पोलिसांनी बाजूला केलेला नाही. सदर लोणंद शिरवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.

