जानेवारी २०२५ ते जून अखेर १२९२ वाहनावर कारवाई, ६ लाख ६३ हजार ६०० रुपये दंड
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी,तळमावले परिसरामध्ये जानेवारी २०२५ पासून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ढेबेवाडी पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, यामध्ये ट्रिपलसीट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन पार्किंग करणे, पोलिसांचे आदेश व इशारे न पाळणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे,मद्यपान करून वाहन चालवणे, बोगस नंबर प्लेट लावून वाहनांचा वापर करणे अशा वाहनांवर केसेस करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ प्रविण दाईंगडे यांनी दिली.

मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याने बेजबाबदारपणे वाहने चालवणा-यांना चांगलाच चाफ बसला असल्याने इतर वाहनधारकांचेही धाबे दणांदले आहेत.ढेबेवाडी बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवल्याने वाहतूक कोंडी फुटली आहे. अतिक्रमण हटलेल्या ठिकाणी बांधकाम विभागाने नो पार्किंगचे दिशादर्शक फलक लावले आहेत.त्यामुळे येथे बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत.



