महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
खंडाळा : वीर धरण पाटबंधारे खात्याचा एक शिपाई फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याच्या वरद हस्ताने शासकीय मुद्देमालावर हात साफ करत असून या प्रकरणी चौकशी करून सबंधित फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी वाठार कॉलनी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
चोरीस गेलेल्या लोखंडी खिडक्या
खंडाळा व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर १९६० च्या दरम्यान वीर धरण बांधले गेले, त्याच वेळेस पाटबंधारे खात्याची वसाहत उदयास आली. १९६० ते २००४ पर्यंत असंख्य कर्मचारी या खात्यामध्ये होते तसेच वसाहतीमध्येही शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण राहायला होते पण गेल्या काही वर्षांपासून या वाठार वासाहतीची शोभा कमी झालेली आहे.अशातच वीर धरण पाटबंधारे खात्याचा एक शिपाई आत्माराम बाठे हा शिपाई कामासोबतच पाटबंधारे खात्याच्या प्रॉपर्टीच्या देखभाल करण्याचे काम करत आहे म्हणजेच शासकीय मुद्देमालावर हात साफ करत आहे.
दुचाकीवर साहित्य चोरी करून नेहताना
तो नेहमीच ऑन ड्युटीवर असताना सुद्धा नशेमध्ये असतो, असे असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई का करत नाही ? वीर धरणाचे मुख्य सांडव्याचे पोलादी गेट मध्यंतरी बदललेले असून जुने पोलादी गेट पाटबंधारे खाते च्या वाठार कॉलनी येथील ऑफिसच्या आवारात दिसून येत होते पण गेल्या काही महिन्यांपासून तेही पोलादी गेट गायब झालेले आहे. त्यासोबतच ज्यावेळी इरिगेशन ऑफिसचे नूतनीकरणाचे काम झाले त्यावेळेस तोडीचा घडवलेला दगड मोठ्या प्रमाणात निघाला होता, तो निघालेला तोडीचा दगड सुद्धा ऑफिसच्या आवारातून गायब झालेला आहे याचे उत्तर ऑफिसचे अधिकारी देतील का ? या शिपायासोबतच येथील ऑफिसचे अधिकारी सुद्धा या भंगार विक्रीमध्ये सामिल आहेत की काय असा प्रश्न पडतो, की वसाहतीमधूनच अन्य कोणी या शिपायाला साथ देत आहे का असा प्रश्न पडतो.
तसेच वसाहती मधील राहणाऱ्या नागरिकांकडून कर वसुलीच्या नावाखाली हा शिपाई आत्माराम बाठे हप्ते वसुली करतो अशी वाठार वसाहत मध्ये चर्चा आहे.५ जून २०२४ रोजी ह्या शिपायाने वसाहतीमधील लोखंडी साहित्य कंपाऊंडच्या अँगल लोखंडी गज व इतर लोखंडी साहित्य एका भंगारवाल्याला विकताना निदर्शनास आला पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई का केली गेली नाही की या शिपायाची फलटण डिव्हिजनचे मुख्य एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर शिवाजीराव जाधव यांच्यावर सुद्धा दहशत आहे की काय ? हा प्रश्न आज सुद्धा गुलदस्त्यामध्ये आहे.
फलटण डिव्हिजनचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर शिवाजीराव जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले सदरची गोष्ट माझ्या कानावर आली असून आम्ही माहिती घेऊन कारवाई करू तरीसुद्धा आज अखेर तो शिपाई मुक्त संचार करत आहे त्यामुळेच घर का भेदी लंका ढाए अशी अवस्था या पाटबंधारे खात्याच्या ऑफिसची झालेली आहे. सदर प्रकरणी चौकशी करून पाठीशी घालणाऱ्या व सहभागी असणाऱ्या सबंधित फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी वाठार कॉलनी येथील ग्रामस्थांनी केली आहे.