फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ? सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

फलटण:- विडणी ता.फलटण येथील २५ फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ऊसाच्या शेतात गुलाल कुंकू दिवाची वात नारळ काळी बाहुली मिळून आल्याने अंधश्रध्देचा नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.ऊसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ कुंकू गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी बाहुली सुरी मिळून आल्याने सदर प्रकार आघोरी नरबळी असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळा वरुन मिळालेली माहीती अशी की, विडणी ता.फलटण २५ फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी अंदाजे ४/५ दिवसा पूर्वी अज्ञात व्यक्तीने अज्ञात महिलेचा खुन करुन ऊसाच्या शेतात टाकून फरार झाला असून अज्ञात महिलेचा अर्धवट मृतदेह सडलेला अवस्थेत आढळून आला. सदरचा मृतदेह हिस्ञ प्राण्याने कबरे पासून सडलेला भाग ऊसाच्या शेतातून ओढून बाहेर आणला असता सदरची घटना लक्षात आली.

महिलेचे कबरे पासून खालचे धड वेगळे होते तर कवटी दोनशे तिनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आले तर मधले धड घटनास्थळी दिसून आले नाही धडाचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहेत.घटनेची माहिती पोलिस पाटील शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कळवली.घटनास्थळी पोलिस उप अधिक्षक वैशाली कडूकर, उप विभागीय अधिकारी राहूल धस, पोलिस निरिक्षक सुनिल महाडीक, उपनिरीक्षक मच्छिद्र पाटील, शिवाजी जायपञे शिवानी नागवडे भेट दिली असून परिसरातील ऊसाच्या शेतात पाहणी केली.

ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा मिळून आल्याने सदर प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!